MK Digital Line
कोरोनाच्या महामारीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सामान्य नागरिकांकडून मनपाने लाखो रुपयांचा दंड वसूल केला. याची अंमलबजावणी अजूनही कठोरपणे सुरू आहे.
मात्र, याच नियमांचे उल्लंघन मनपाचे महापौर आणि आयुक्त सर्रासपणे करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. चमकोगिरी करण्याच्या नादात मनपाच्या महापौर आणि आयुक्तांनी मास्क न घालता सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत फोटोसेशन केले आहे.
याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सामान्य नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. त्यानंतर ही होणारी नाचक्की रोखण्यासाठी महापौर आणि आयुक्तांनी प्रत्येकी ५०० रुपय दंड भरून या प्रकरणाची तडजोड केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
कोरोनाच्या महामारीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चंद्रपूर शहरात ही संख्या सर्वाधिक आहे. सध्या राज्यात संचारबंदी लागू झाली आहे.
तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. त्यामुळे सर्व व्यवहार, व्यापार ठप्प आहे. विनाकारण घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे, तसेच मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाते, त्यांना हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जातो. नाकाच्या खाली मास्क गेलेल्यावर देखील कठोर कारवाई केली जात आहे. लपून दुकाने, प्रतिष्ठाने सुरू ठेवणाऱ्यांवर देखील कारवाई होत आहे.
Post a Comment